EKAANT JOURNAL   /   WILDLIFE STORIES

Nature's Gallery

निसर्गाच्या सान्निध्यात अनुभवलेले काही अनमोल क्षण...
पक्ष्यांचे रंग, त्यांचे अनोखे विश्व आणि वन्यजीवनातील अविस्मरणीय अनुभवांची एक सुंदर सफर.

EXPLORE THE STORIES ↘
01FIELD
OBSERVATIONS
THE BEAUTY OF THE WILDSCROLL TO DISCOVER ↓
A JOURNEY THROUGH THE WILD

Stories from the natural world.

क्षण टिपलेले, अनुभव जपलेले आणि निसर्गाने शिकवलेल्या गोष्टी...

Blue-eared Kingfisher in Konkan
01 / RARE ENCOUNTER

कोकणातली एक दुर्मिळ आणि अविस्मरणीय भेट!

BLUE-EARED KINGFISHER

कोकण हे नेहमीच माझ्यासाठी खास राहिले आहे. माझ्या भावाचे कोकणातील घर म्हणजे निसर्गाच्या सान्निध्यात वसलेले एक सुंदर ठिकाण.

या घरासाठी काही ऑटोमेशनची कामे करण्यासाठी आतापर्यंत तीन वेळा कोकणात जाणे झाले. घरात नसतानाही काही गोष्टी दूरवरून नियंत्रित करता याव्यात, हा त्यामागचा उद्देश होता. पण यावेळच्या तिसऱ्या भेटीत निसर्गाने एक अनपेक्षित भेट दिली!

यावेळी नशिबाने साथ दिली आणि वाहत्या पाण्याच्या प्रवाहाजवळ Blue-eared Kingfisher (ब्ल्यू-इअर्ड किंगफिशर) या अतिशय सुंदर पक्ष्याचे दर्शन घडले. त्याला कॅमेऱ्यात टिपण्याची संधी मिळाली, हा आनंद काही वेगळाच होता.

हा पक्षी अतिशय दुर्मिळ, लाजाळू आणि सहसा नजरेस न पडणारा आहे. स्वच्छ, शांत आणि दाट सावली असलेल्या पाणवठ्यांच्या परिसरातच त्याचे वास्तव्य असते. त्यामुळे या ठिकाणी त्याचे दर्शन होणे ही केवळ पक्षीप्रेमींसाठी आनंदाची गोष्ट नाही, तर या परिसरातील निसर्ग अजूनही किती सुंदर, स्वच्छ आणि अबाधित आहे याची जणू पावतीच आहे!

या परिसरात या पक्ष्याला त्याच्या विणीच्या हंगामात पाहण्यासाठी ठिकाणे आहेत. विशेष म्हणजे, या पक्ष्याची उपलब्ध असलेली जवळपास ९० टक्के छायाचित्रे विणीच्या हंगामातील आहेत.

अशा परिस्थितीत नोव्हेंबर महिन्यात, संध्याकाळच्या उशिराच्या वेळी, वाहत्या पाण्याच्या प्रवाहाजवळ या सुंदर पक्ष्याचे दर्शन होणे हा खरोखरच दुर्मिळ आणि आनंदाचा क्षण होता.

घराच्या ऑटोमेशनच्या कामासाठी केलेल्या या तिसऱ्या भेटीत अशी अनपेक्षित भेट मिळेल, याची अजिबात कल्पना नव्हती.

कधी कधी पक्ष्यांच्या शोधात जाण्याची गरज नसते... आपण योग्य ठिकाणी आणि योग्य वेळी असलो की निसर्ग स्वतःहून असे काही सुंदर क्षण आपल्या पदरात टाकतो!

कोकणातील हा अविस्मरणीय क्षण... निसर्गाने दिलेली एक अनमोल भेट!

Pond Heron hunting near water
02 / MOMENTS IN WILDLIFE

संयम, शांतता आणि अचूक क्षण... एका Pond Heron ची शिकार!

POND HERON

सकाळी लवकर तलावाच्या परिसरात पक्ष्यांच्या हालचाली टिपत बसलो होतो. तेवढ्यात पाण्याच्या काठावर एक Pond Heron (तळ्याकाठचा बगळा) अगदी शांतपणे उभा असलेला दिसला.

त्याची नजर मात्र पाण्यावर खिळलेली होती. कितीतरी वेळ तो अगदी निश्चल उभा होता. ना हालचाल, ना कसली घाई! जणू काही आजूबाजूच्या जगाशी त्याचा काही संबंधच नव्हता.

पण त्याच्या या शांततेमागे एक वेगळीच तयारी सुरू होती... शिकारीची!

Pond Heron हा अत्यंत संयमी शिकारी आहे. कधी पाण्याच्या काठावर, तर कधी उथळ पाण्यात तासन्तास अगदी स्तब्ध राहून तो आपल्या भक्ष्याची वाट पाहतो. मासा असो किंवा बेडूक, योग्य संधी मिळताच तो क्षणाचाही विलंब न करता झडप घालतो.

आणि अचानक... त्याच्या हालचाली बदलल्या!

क्षणात त्याची मान पुढे आली, नजर अधिक तीक्ष्ण झाली आणि शरीराची ठेवणही बदलली. आता तो पूर्णपणे सावध झाला होता. पुढच्याच क्षणी काय घडणार याची उत्सुकता वाढली.

या चार छायाचित्रांमध्ये त्याच्या हालचालींमधील हाच बदल टिपण्याचा प्रयत्न केला आहे — शांतपणे वाट पाहण्यापासून ते शिकारीसाठी सज्ज होण्यापर्यंतचा प्रवास!

वन्यजीव छायाचित्रणात प्रत्येक वेळी उडणारा पक्षी किंवा शिकार करतानाचा क्षण टिपणे महत्त्वाचे नसते. कधी कधी एखाद्या पक्ष्याचा संयम, त्याची एकाग्रता आणि त्याच्या हालचालींमधील सूक्ष्म बदल टिपण्यातही खरा आनंद असतो.

निसर्ग आपल्याला एक गोष्ट नेहमी शिकवतो — योग्य क्षणाची वाट पाहण्यासाठी संयम हवा!

PHOTOGRAPH & STORY BY VIVEK NAIK
Juvenile Shikra sitting on a tree branch
03 / WILD DISCOVERY

आवाज पक्ष्यांचा... चाहूल एका शिकाऱ्याची!

JUVENILE SHIKRA

सकाळी नदीच्या प्रवाहाजवळ बसून पक्ष्यांच्या हालचाली टिपण्यात रमलो होतो. आजूबाजूला पक्ष्यांची छान लगबग सुरू होती.

अचानक जवळच्या झाडांमधून छोट्या पक्ष्यांचा किलबिलाट आणि गोंधळ वाढू लागला. त्यांच्या आवाजात काहीतरी वेगळे जाणवत होते. माझ्या अनुभवाने लगेच एक अंदाज आला... परिसरात नक्कीच एखादा शिकारी पक्षी (Raptor) असावा!

Raptor म्हणजे शिकारी पक्षी. असे पक्षी आपल्या तीक्ष्ण नजरेने आणि मजबूत नख्यांनी इतर लहान पक्षी, उंदीर, सरडे किंवा इतर छोटे प्राणी यांची शिकार करतात. उदाहरणार्थ, गरुड, ससाणा, घार आणि शिक्रा.

छोट्या पक्ष्यांचा हा अलार्म कॉल ऐकून आजूबाजूच्या झाडांवर नजर फिरवायला सुरुवात केली आणि अखेर एका फांदीवर बसलेला एक सुंदर Juvenile Shikra (तरुण शिक्रा) नजरेस पडला!

तो अगदी शांतपणे एका फांदीवर बसला होता; पण त्याची नजर मात्र परिसरातील प्रत्येक हालचालीवर होती. त्याची शिकार शोधण्याची तयारी आणि सावध बसण्याची ठेवण स्पष्ट दिसत होती.

लहान पक्ष्यांमध्ये निर्माण झालेला गोंधळ आणि त्याच वेळी फांदीवर दबा धरून बसलेला हा शिकारी... निसर्गातील अन्नसाखळीचा एक सुंदर अनुभव होता.

या भेटीत मला सर्वात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे पक्ष्यांना पाहण्याआधी त्यांच्या आवाजातून शिकारी पक्ष्याची चाहूल लागणे!

पक्षीनिरीक्षण म्हणजे केवळ पक्षी शोधणे नव्हे, तर त्यांच्या आवाजातून, हालचालींतून आणि वागण्यातून निसर्गाची भाषा समजून घेणे!

कधी कधी कॅमेरा पक्ष्याला टिपतो, पण त्याआधी आपले कान आणि अनुभव आपल्याला त्याच्यापर्यंत पोहोचवतात!

PHOTOGRAPH & STORY BY VIVEK NAIK

निसर्ग... प्रत्येक भेटीत एक नवी गोष्ट!

प्रत्येक झाडामागे, प्रत्येक पक्ष्याच्या आवाजामागे आणि प्रत्येक निसर्गरम्य क्षणामागे एक सुंदर गोष्ट दडलेली असते. अशाच काही अविस्मरणीय अनुभवांचा आनंद घेण्यासाठी Nature's Gallery ला भेट देत राहा.

A MOMENT WITH NATURE

निसर्गाचा एक सुंदर अनुभव

शब्दांपलीकडचा निसर्ग अनुभवूया... पक्ष्यांचे विश्व आणि कोकणातील निसर्गसौंदर्य!

Invest in our Forest Homes (Village Jamsut, Guhagar - Konkan) for gifting Mother Nature to your generation next.

Pixel ID: 424615441962476

Disclaimer: This perspective image may not be to the scale or may not represent actual facade / elevation. The details of windows, paints, elevation features, landscaping, ground development, trees etc. This perspective is an artist’s impression and would be different to actual development. The viewers affirm that he / she / they have not taken his/ her / their decision of purchase/booking by viewing this perspective. The company is not responsible for the action of the viewer’s booking / purchasing a unit relying on this perspective. This is a revamped version of our website. Any communication, plot availability, floor plans, amenities, specifications, prices or any kind of project information is subject to change as & when required according to the review & changes without prior notice. Plans finalized on the Construction Contract and plots mentioned on the Final Sell Deed will be binding.

Contact
+91 8550997117
+91 9423013607
+91 7276318787
widewingscorporation@gmail.com

Site Address -

Gat No.1713, Village Jamsut, Taluka, Guhagar, Maharashtra 415703
//